HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भारुड बहिरा जालो या या जगी भारुड अलक्ष लक्ष मी भिकारी
भारुड - संसार नगरी बाजार भरला भाई


भारुड - संसार नगरी बाजार भरला भाई

33
भारुड - संसार नगरी बाजार भरला भाई

संसार नगरी बाजार भरला भाई ।
कामक्रोध लोभ याचे गिर्‍हाइक पाही ॥ १ ॥
यात सुख नाही त्यात सुख नाही ।
या हाटाचे सुख कोठे नाही ॥ २ ॥
या हाटासी थोर थोर मेले ।
नारद शुक भीष्म उमगले ॥ ३ ॥
आणिक संती बाजार पाहिला ।
व्यर्थ जाणोनि निराश भाविला ॥ ४ ॥
या बाजारी सुख नाही भाई ।
माझे माझे म्हणॊ वोझे वाही ॥ ५ ॥
एका जनार्दनी बाजार लटिका ।
संतसंगावाचुनी नोहे सुटिका ॥ ६ ॥
Translation - भाषांतर

N/A
33
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-03-06T07:42:50.0000000Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us