HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|श्री दत्तात्रेयाचे अभंग|
श्रीदत्तात्रेयाचे अभंग देव पाहूं इच्छी मन । घरीं श्रीदत्तात्रेयाचे अभंग स्थळ रितें संतां विण । ते
श्रीदत्तात्रेयाचे अभंग - आदिअंतीं एक ब्रह्म । मध्य...


दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.



42
अभंग

आदिअंतीं एक ब्रह्म । मध्यें कोठोनी हा भ्रम ॥१॥

कैंक काळाचा चूकला । जीव शोधी निज मूळा ॥२॥

उफराटी होतां दृष्टि । ब्रह्मीं भासे नसती सृष्टि ॥३॥

डोळ्या कावीळ जाहलें । अवघें पीतचि भासलें ॥४॥

ज्ञानांजनें दृष्टि आली । भ्रांति समूळ नासली ॥५॥

दोर अंधारीं न दिसे । तोंवरीच सर्प भासे ॥६॥

आप्‍तें दीप दीप्‍त केला । सर्पभाव लया गेला ॥७॥

आदिअंतीं एक दोर । मध्यें भुजंगम घोर ॥८॥

झाला नसोनी भासला । अज्ञ देखोनी त्रासला ॥९॥

तैसें ब्रह्मीं दिसे जग । झालें नसोनी वाउग ॥१०॥

जीव देखोनी घाबरे । वांया जन्ममृत्यु फिरे ॥११॥

देहीं देव ओळखिला । ’रंग’ अभय जाहला ॥१२॥

Translation - भाषांतर

N/A
42
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T08:51:39.8278352-04:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us