HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|संत बहिणाबाईचे अभंग|
संत बहिणाबाईचे अभंग भ्रतारें टाकिलें मोट बांध संत बहिणाबाईचे अभंग कृपा उपजली जयराम स्वामीसी
संत बहिणाबाईचे अभंग - जयराम समर्थ ज्ञानाचा सागर...


संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे.

Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She composed 473 abhangas, brief devotional hymns in the Marathi language of Maharashtra. The first 116 of her songs narrate her present life and give a brief description of 12 previous lives; this part of her work is usually called her Atmanivedana, the story of her gradual complete self-dedication to Vishnu. In her 70s and preparing for her final death, Bahina told her story in verse to her son, who wrote it down.



23
संत बहिणाबाईचे अभंग

जयराम समर्थ ज्ञानाचा सागर । साक्ष तें अंतर त्याचें तया ॥ १ ॥

बोलाविलें तेणें हिरंभटाप्रती । माझी तया स्थिती पुसीयेली ॥ २ ॥

सांगितला तेणें वृत्तान्त सर्वही । वर्तला जो कांहीं गृहीं त्याचें ॥ ३ ॥

स्वप्नागत गुरु तुकोबाचे रूपें । स्वप्नींचिये कृपें बोध केला ॥ ४ ॥

सावध होउनी ते मुली बैसली । गायीस गौरविली कुर्वाळूनी ॥ ५ ॥

दुग्ध दोहोनिया घेतलें तियेनें । पाणी आणी तृणें भक्षीतसे ॥ ६ ॥

परी तें मुलीचें रूप पालटलें । पूर्ण तें दाटलें ह्रदय तिचें ॥ ७ ॥

तुकोबाचा छंद अंतरीं लागला । मायबापें तिला सांगताती ॥ ८ ॥

भ्रतार हा तिचा वेडावला राहे । उगाची तो पाहे तियेकडे ॥ ९ ॥

छांदिष्टा होउनी बैसली घरांत । तुकोबासी चित्त लावुनीया ॥ १० ॥

ऐसा हा वृत्तांत हिरंभट सांगे । जयराम निजांगे संतोषला ॥ ११ ॥

बहिणी म्हणे ऐसा निर्धार ऐकोनी । जयराम स्वामींनीं कृपा केली ॥ १२ ॥

Translation - भाषांतर

N/A
23
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-01-02T22:53:53.9120624Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us