HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानदेवतेहत्तिशी|
श्रीज्ञानदेवतेहत्तिशी अभंग १५ श्रीज्ञानदेवतेहत्तिशी अभंग १७
श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग १६


"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.



39
अभंग १६

पायातळीं तळपें ब्रह्मामपि । मकारोहो उंच गगनीं ।

आदिमध्य अवसानी । त्याचा मार्ग न सांपडे ॥१६॥

टीका

पायीं तळपे ब्रह्ममणि । अकारपैलाडु गगनी मकाराहोनि । अति उंच ॥१॥

मकारी पहातां उकार । उकारीं पहाता अकार । प्राणपण जे साचार । शद्वपणाचे ॥२॥

अकार स्वर शब्द प्राण । स्वयें बोलिले भगवान । नातरी शब्दा शब्दपण । केविं येई ॥३॥

मकार तो नादस्थिति । उकार ते पाहातां गति । अकार अधिष्ठान प्रचिती । गगनाची ॥४॥

तयापैल ब्रह्मामणी । तळपें कैंचा उन्मन गगनी । चंद्रसुर्य हारपोनि । गेले जेथ ॥५॥

जेथ जाले पा अद्वैत परिपुर्णचि निभ्रांत । वर्तुळातु आदिमध्यांत । दावावें काय ॥६॥

जाले एकादी अवसान । आदिमध्या अंत दावी कोण । निशिदिनीचे पहाणें आटोन । गेलें जेथ ॥७॥

जेथ आदिमध्यांत ऐलीकडे । तेथ मार्ग केंवि सांपडे । ब्रह्मामणीचिया उजेंडे । गगन लोपे ॥८॥

Translation - भाषांतर

N/A
39
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2010-01-24T21:15:28.9472160-05:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us