HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय विसावा|
एकनाथी भागवत श्लोक ६ वा एकनाथी भागवत श्लोक ८ वा
एकनाथी भागवत - श्लोक ७ वा


नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.



11
श्लोक ७ वा

निर्विण्णानां ज्ञानयोगो, न्यासिनामिह कर्मसु ।

तेष्वनिर्विण्णचित्तानां, कर्मयोगस्तु कामिनाम् ॥७॥

जे कां ब्रह्मभुवनपर्यंत । साचार जीवींहूनि विरक्त ।

जे विधिपूर्वक संकल्पयुक्त । कर्म त्यागित संन्यासी ॥७४॥

ऐशिया अधिकार्‍यांकारणें । म्यां ’ज्ञानयोग’ प्रकट करणें ।

जेणें कां निजज्ञानसाधनें । माझी पावणें सायुज्यता ॥७५॥

आतां जे कां केवळ अविरक्त । विषयालागीं कामासक्त ।

त्यांलागीं म्यां प्रस्तुत । ’कर्मयोग’ येथ प्रकाशिला ॥७६॥

उंच नीच अधिकारी देख । दोनी सांगितले सविशेख ।

आतां तिसरा अधिकारी अतिचोख । अलोलिक अवधारीं ॥७७॥

Translation - भाषांतर

N/A
11
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-10-24T02:40:51.2472490-04:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us