HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय पंधरावा|
एकनाथी भागवत श्लोक २ रा एकनाथी भागवत श्लोक ४ व ५ वा
एकनाथी भागवत - श्लोक ३ रा


नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.



18
श्लोक ३ रा

श्रीभगवानुवाच ।

सिद्धयोऽष्टादश प्रोक्ता धारणा योगपारगैः ।

तासामष्टौ मत्प्रधाना दशैव गुणहेतवः ॥३॥

सिद्धी अष्टादश जाण । त्यांची धारणा भिन्न भिन्न ।

ऐंसे बोलिले योगज्ञ । योगसंपन्न महासिद्ध ॥३७॥

या नांव गा सिद्धी समस्ता । यांत अष्ट महासिद्धी विख्याता ।

त्या माझे स्वरूपीं स्वरूपस्थिता । आणिकासी तत्त्वतां त्या नाहीं ॥३८॥

मनसा वाचा कर्मणा जाण । विसरोनि देहाचें देहपण ।

माझेनि स्वरूपें अतिसंपन्न । चैतन्यघन जो झाला ॥३९॥

त्यापाशीं या सिद्धी जाण । उभ्या असती हात जोडून ।

परी तो न पाहे थुंकोन । निचाड जाण यापरी ॥४०॥

इतर दहा सिद्धींची कथा । ज्या सत्त्वगुणें गुणभूता ।

साधक शुद्धसत्त्वात्मा होतां । त्यापाशीं सर्वथा प्रकटती ॥४१॥

अष्ट महासिद्धींची कथा । तुज मी सांगेन तत्त्वतां ।

ज्या माझे स्वरूपीं स्वभावतां । असती वर्तता अहर्निशीं ॥४२॥

Translation - भाषांतर

N/A
18
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-10-07T21:50:56.6305643-04:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us