HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|श्रीकृष्ण आरती संग्रह|
श्रीकृष्णाची आरती कंसराये गर्भ वधियेले सात श्रीकृष्णाची आरती नंदयशोदाबाला कुटिलालकजाला
श्रीकृष्णाची आरती - जय बासूरिया तूंते कृपाळा ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



56
श्रीकृष्णाची आरती

जय बासूरिया तूंते कृपाळा करितों ही आरती ॥ धृ. ॥

माधव हे वामना मधुसूदन यदुराया ।

ब्रह्मादिक सूर प्रेमानंदें वांच्छिताति तव पायां ॥

जय दीनदयाळा तूंतें कृपाळा ॥ जय. ॥ १ ॥

जगदात्मा हे केशवा गोविंदा जगपाला ।

बाळपणी स्तनपानें पूरनां वधियलीं तत्काल ॥

जय व्रजगोपाळा तूंतें कृपाळा ॥ २ ॥

विठ्ठलात्मजे ध्यातसे धाव आतां मम माय ।

मद्वय हरीं हरीं सदय होऊनि मुक्तीचा दे ठाय ॥

जय भक्तवत्सला तूंतें कृपाळा ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
56
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T01:04:12.5557520-04:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us