HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
देवीची आरती सुरवरदायिनी मुरहरसुख देवीची आरती ओवाळीन वोजा ॥ शिवसहज
देवीची आरती - विडा घ्याहो अंबाबाई ...


देवीची आरती

56
देवीची आरती

विडा घ्याहो अंबाबाई । जगज्जननी माझे आई ।
विनवितो दास प्रेमें ॥ हस्त जोडुनी आई ॥ धृ. ॥
त्रिगुणपूगीफळ । चूर्ण केलें निर्मळ ॥
निर्गुण केशराने ॥ रंगविलें सोज्वळ ॥ विडा. ॥
प्रपंच पक्व पानें । हाती घेउनि विवेकाने ।
द्वैतभाव जाळूनिया ।वर लावला चूना ॥ विडा. ॥ २ ॥
भावार्थ शुभ्रकार । प्रेमलवंग त्यांत ॥
सुवासिक सर्व द्रव्यें ॥मेळविलीं समस्त ॥ विडा. ॥ ३ ॥
जय जय कुळदेवते ।आदिशक्ती मूळमाते ॥
घेउनि विडा हाती ।हरी तुज विनवीत ॥ विडा घ्याहो. ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
56
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-24T02:14:16.3010976Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us